ऐन तारुण्यात कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून मा.आण्णांनी जपलेली गुणवत्तेची, आर्थिक स्थितीची व मिळवण्याची राष्टीय पातळीवरील विविध पारितोषिकांची परंपरा चालू ठेवण्याची क्षमता, त्यांनी संपूर्ण साखर उद्योगाला दाखवून दिली मा. बापू व आण्णांना अपेक्षित नव समाज निर्मितीचा ध्यास घेऊन पलूस कडेगाव तालुक्यातील युवकांना बरोबर घेऊन त्यांनी साखर उद्योगाबरोबरच आर्थिक, पाणीपुरवठा, खरेदी विक्री संघ, विविध सह. सोसायटयांची निर्मिती करून तरूणांना विविध संस्थात संधी देवून अतिशय सक्षमपणे सर्वच संस्था चालवलेल्या आहेत. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना गुणवत्तेचे बी बियाणे, खते, लागवड वाजवी दरात मिळावीत या उद्देशाने पलूस कडेगाव खरेदी विक्री संघाच्या चार शाखा मार्फत शेतकऱ्यांच्या बांधापर्यत सेवा दिली जाते.
पलूस व कडेगाव तालुक्यातील ज्या क्षेत्राला बारमाही पाण्याची उपलब्धता नव्हती त्या 'क्षेत्राला पाणीपुरवठा योजना चालू केल्या आहेत. कृष्णा काठावरील क्षारपड झालेल्या जमिनींचा अतिशय सुक्ष्म अभ्यास करून त्या जमिनीसाठी निचरा पाईलाईनचा ड्रीम प्रोजेक्ट चालू केला. त्याची प्रत्यक्ष सुरूवातपुणदी येथून चालू करून संपूर्ण कृष्णाकाठवरील जमिनी क्षारमुक्त करण्याचा धाडसी कार्यक्रम चालू केला. त्यासाठी गावोगावी प्रबोधन करून तरूण वर्गाला सहभागी करून घेतले. इतकेच त्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य कमीत कमी व्याज दरात उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी, तरूण व महिलांना दैनंदिन आर्थिक गरजांना मदत व्हावी या उद्देशाने क्रांती अर्बन सारखी संस्था उभारून भक्कमपणे स्वतःच कारभार चालवित आहेत. कडेगाव-पलूस तालुक्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात, गरीब गरजू कुटुंबातील रूग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने भाऊंच्या सौभाग्यवती धनश्रीताई वहीनी साहेब यांनी शरद आत्मनिर्भर सारखी योजना चालू करून परिसरातील महिलांना स्वावलंबी बनवले आहे.
पुणदी येथून चालू करून संपूर्ण कृष्णाकाठवरील जमिनी क्षारमुक्त करण्याचा धाडसी कार्यक्रम चालू केला. त्यासाठी गावोगावी प्रबोधन करून तरूण वर्गाला सहभागी करून घेतले. इतकेच त्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य कमीत कमी व्याज दरात उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी, तरूण व महिलांना दैनंदिन आर्थिक गरजांना मदत व्हावी या उद्देशाने क्रांती अर्बन सारखी संस्था उभारून भक्कमपणे स्वतःच कारभार चालवित आहेत. कडेगाव-पलूस तालुक्यातील महिला स्वावलंबी व्हाव्यात, गरीब गरजू कुटुंबातील रूग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने भाऊंच्या सौभाग्यवती धनश्रीताई वहीनी साहेब यांनी शरद आत्मनिर्भर सारखी योजना चालू करून परिसरातील महिलांना स्वावलंबी बनवले आहे.रुग्णांना मदत करणेचे कार्य अव्हयातपणे चालू आहे. हे सर्व उद्योग, योजना राबवत असताना सर्व व्याप सांभाळत असताना, नम्रता, सेवावृत्ती, व संवेदनशीलता थोडीही कमी होऊ न देता दोन्ही तालुक्यातील शेकडो युवकांचे प्रेरणास्थान बनून तत्वाशी कधीही तडजोड केली नाही याची प्रचिती २०२४च्या विधानसभेच्या निवडणूकीत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली.
अशा या उमद्या नेतृत्वाला उत्तम आरोग्याच्या व उज्वल भविष्याच्या लाख लाख शुभेच्छा...!
अँड.सतिश एन. चौगुले,
संचालक क्रांती सह. साखर कारखाना,
शब्दाकांन : वैभव माळी, पलूस

No comments:
Post a Comment