भिलवडी: वार्ताहर
दिनांक 17/08/25/ रोजी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास भिलवडी- माळवाडी दरम्यान असणाऱ्या सेकंडरी स्कूल जुनियर कॉलेज लागतच्या बस बस स्थानकाच्या समोर रस्त्यावरती महावीर परिसा ऐतवडे हे गंभीर जखमी अवस्थेत दिसून येताच गावातील युवकांनी त्यांना भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील खाजगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सुमारे तीन ते चार दिवसाच्या उपचारानंतर महावीर परिसा ऐतवडे, वय अंदाजे ५५ वर्ष राहणार भिलवडी ता.पलूस त्यांचा मृत्यू झाला आहे.
महावीर परिसा ऐतवडे रा भिलवडी यांचे आकस्मित निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी ऐतवडे मळा कॅनॉल येथे ठीक सकाळी 9.30 वाजता होणार आहे.


No comments:
Post a Comment