काकासाहेबांचा भक्कम वारसा गिरीशजी चितळे चालवत आहेत : शरद लाड - Palus Kadegaon News

Breaking

Monday, February 17, 2025

काकासाहेबांचा भक्कम वारसा गिरीशजी चितळे चालवत आहेत : शरद लाड



 भिलवडी: वार्ताहर 

चितळे उद्योग समुहाचे उद्योगपती स्व.काकासाहेब चितळे यांनी जायंट्स ग्रुपची उभारणी केली. समाजाची नाळ जपण्याचे काम चितळे कुटुंब करत आहे. एक वेगळी उर्जा तयार करण्याचे काम जायंट्समध्ये आहे. काकासाहेब चितळेंचे यात मोठे योगदान आहे आणि त्यांचा भक्कम वारसा गिरीश चितळे चालवत असल्याचे प्रतिपादन शरद लाड यांनी केले.


गिरीश चितळे म्हणाले, 

भिलवडी जायंट्सने भरीव कामगिरी केली आहे. सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळाली आहेत. नवीन सदस्य व पदाधिकारी यांनीही उल्लेखनीय कार्य करावे.



जायंट्स ग्रुपच्या नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी महावीर चौगुले, उपाध्यक्षपदी विशाल सावळवाडे, शिवाजी कुकडे यांची तर सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी सविता महावीर चौगुले तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला परीट, स्नेहा शेडबाळकर यांची निवड करण्यात आली. यंग जायंट्सच्या अध्यक्षपदी ऋतिक पाटील आणि उपाध्यक्षपदी योगेश वाळवेकर, वरद चौगुले यांची निवड केली. यावेळी गुंडूराव वसवाडे यांनी नुतन सदस्यांना शपथ दिली.

यावेळी डी.आर.कदम यांना सेवागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 

यावेळी प्रशांत माळी, साधना मालगावे, डी.आर.कदम, विलासराय पवार, सतीश बापट, जि.प सदस्य सुरेंद्र वाळवेकर, क्रांती संचालक विजय पाटील, सरपंच सीमा शेटे, सुरैय्या तांबोळी, दत्ता उतळे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment