भिलवडी येथील सरळी पुलाजवळ शाळकरी मुलगा आपल्या आईच्या हातामध्ये हात देऊन रस्त्याच्या बाजूने चालत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच.१० ए ए.डब्ल्यू.९७२९ ह्या डंपरने मागून धडक दिल्याने राज वैभव पवार वय ७ वर्ष रा.भिलवडी याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच डंपर चालकाने पलायन केले.
आईच्या हातातून तिचा चिमुकला काळाने हिरावून घेतला असल्याने कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या प्रत्यक्ष दर्शनी मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने आईचा आक्रोश पाहता परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घटनास्थळी गर्दी केली होती.

भिलवडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे भिलवडी ते माळवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक बेभान वेगाने होत असून त्याचा परिणाम गेल्या एक दोन वर्षांमध्ये माळवाडी आणि भिलवडी गावातील जवळपास सहा लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
:- भिलवडी माळवाडी ग्रामपंचायत व भिलवडी शिक्षण संस्थेने गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थी व नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाय योजने संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा:- सचिन खंडेराव पाटील
सरळी नाल्यावरील पुलाचा परिसर मानव निर्मित मृत्यूचे जाळे बानूलागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या राज्यमार्गावरती भिलवडी- माळवाडी दरम्यान गतिरोधक, गतिमर्यादा निश्चित करणारे सी सी टीव्ही कॅमेरे व वेग मर्यादा फलक लावण्याची मागणी भिलवडी माळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत निकम, सचिन पाटील, अमोल पाटील,प्रमोद पुजारी यांनी केली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाच्या माध्यमातून राज्यमार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment